Ratnagiri Sea : समुद्राचं पाणी एवढं कसं वाढलं? पाण्याचा रंगही बदलला; किनाऱ्यावरील होतं नव्हतं धुवून नेलं

Ratnagiri : रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. समुद्राच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने चौपाटीवरील दुकानांमध्ये देखील पाणी शिरले आहे. समुद्राच्या लाटांमध्ये पर्यटकांच्या वस्तू देखील वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी लागले आहे. कोकण किनारपट्टीवरील बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलले. दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आले आहे.

मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह

रत्नागिरी, कोकण किनारपट्टीवर मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मॉन्सून सक्रिय होण्याच्या आधी निळाशार समुद्राचा रंग बदलला आहे. समुद्राचे अंतर्गत प्रवाह बदलल्याने समुद्राचा रंगही लालसर झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीवर मोठी समुद्राची भरती आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply