Ratnagiri Rain Updates : इर्शाळवाडी घटनेनंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ॲलर्ट, 15 गावांमधील 540 नागरिक स्थलांतरित

Ratnagiri News : इर्शाळवाडी येथील घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासन अधिक सर्तक झाले आहे. जिल्हाधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांनी दरड प्रवण गावांवर विशेष लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या आणि दरड प्रवण क्षेत्रातील गावांना भेटी देत जिल्ह्यातील 15 गावांमधील एकूण 540 नागरिकांना स्थलांतरित केल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. 

रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले परशुराम घाट आणि इतर घाट सुरु आहेत. तेथील वाहतूक सुरळीत सुरु आहे. जिल्ह्यातील 15 गावांमधील 540 जणांना स्थलांतरीत केले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार सूचित केलेल्या दरडप्रवण गावात जावून तालुकास्तरीय यंत्रणेने नागरिकांना स्थलांतरीत करा अशा सूचना केल्या आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले एनडीआरएफ पथक चिपळूणमध्येआहे. पोलीस, नगरपरिषद, महसूल पथके तयार करुन नियुक्त केलेले आहेत. चिपळूण मधील पाणीही ओसरले आहे. तेथील स्वच्छता करण्यात आली आहे.

Jaipur Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी राजस्थान हादरलं; जयपूरमध्ये ४.४ रिश्टर स्केलचे तीन धक्के, नागरिक भयभीत

जिवीत हानी कोणतीही नाही. जनावरांचे आणि इतर नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान चिपळूण व खेड तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्यातील सर्व शाळांना (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सुट्टी जाहीर केली असल्याने शैक्षणिक संस्था बंद आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply