Ratnagiri News : रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्टप्रकरणी मोठी कारवाई

रत्नागिरी : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकेत फार्म हाऊस या निवासस्थानातून सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत. 

साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ईडीने आज सदानंद कदमांना अटक केली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होत का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply