Ratnagiri Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणेंची उमेदवारी कन्फर्म? किरण सामंतांनी माघार घेतल्याची उदय सामंतांची माहिती

Ratnagiri Lok Sabha : ऐन लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे. राज्यातील काही जागांवरील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महायुतीपुढे मोठा पेच उभा राहिला आहे. महायुतीमधील काही जागांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचा समावेश आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांनी दावा ठोकला होता. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील इच्छुक होते. 'या जागेवरून इतर नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा जवळपास मिटल्याचे बोलले जात आहे.

किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा ठोकल्याने महायुतीपुढे मोठा पेच पुढे उभा राहिला होता. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही याच जागेवर दावा आहे. या जागेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून खलबते सुरु होती. मंत्रीउदय सामंत यांनी या जागेबाबत नागपूरमधील पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्री सामंत यांच्या वक्तव्यामुळे नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोललं जात आहे.

Bachchu Kadu : भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये; महायुतीच्या जागावाटपावर बच्चू कडू यांचं भाष्य

मंत्री उदय सामंत म्हणाले,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आधी शिवसेनेचे खासदार जिंकले. त्यामुळे शिंदे गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र, या जागेमुले नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जागेसाठीची वाटाघाटी थांबली आहे'.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, 'या जागेचा सस्पेन्स ठेवला नाही तर प्रश्न विचारणार नाही. या जागेवरून उद्या सेनेचा उमेदवार अर्ज दाखल करेल. तिन्ही नेत्यांना कोण-कुठे निवडून येईल हा अंदाज आहे. आमच्यासोबत सर्चत गट आहे. तिन्ही नेते फॉर्म्युला ठरवतील'.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply