Ajit Pawar News: अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द; कारण गुलदस्त्यात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rashtrawadi Congress Party  : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

नागपुरात काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यांतरअजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्यासहित एमजीएम रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी अस्वस्थ रुग्णांची विचारपूस केली.

तसेच यावेळी अजित पवार यांनी 'हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकते, हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं. किती मृत्यू झालेत हे अजून कळत नाहीये. आम्हाला कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कोणताही आकडा लपवायचा नाही, अशी टीका केली होती.

आज राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचे आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. आज पुण्यात अजित पवारांचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन, मोटार सायकल रॅली, नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व नळ पाणी पुरवठा योजना भूमीपूजन असे कार्यक्रम पुण्यात होते. मात्र, सदर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार हे अद्याप मुंबईतच आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमित शाह यांची गुप्त भेट घेतली अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अजित पवार यांनी फेटाळले आहे. तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन किर्तीकर यांनी अजित पवारांचं भाजप आणि शिवसेना युतीत स्वागत करू असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलं आहे .

शरद पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीत

पुण्यातील सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित शेतकरी मेळावा पार पडत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे .



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply