Rashmi Sukla Phone Tapping Case : रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ; क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

Rashmi Sukla Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप शुक्ला यांच्यावर होता. या प्रकरणात पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. रश्मी शुक्ला या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याबद्दल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला आहे. त्यामुळे माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार आहेत.

पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या रश्मी शुक्ला यांनी काही आमदार, मंत्र्यांचे फोन टॅप केले होते. तसेच यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास देखील झाला. मात्र या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही. यानंतर रश्मी शुक्ला यांनी पोलिस विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली. तसेच यासंदर्भात पुणे न्यायालयात दाखल करण्यात आला होता, जो न्यायालयाने फेटाळला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply