Ramdas Athawale : मविआला देत आहोत अशी टक्कर की, नेत्यांना आली पाहिजे चक्कर; आठवलेंचा चारोळीतून विरोधकांना भन्नाट टोला

Ramdas Athawale :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होण्यासाठी काही तास उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचा उमेदवाराचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार रामदास आठवले हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आठवलेंनी महाविकास आघाडीवर चारोळीतून टीका केली आहे.

खासदार रामदास आठवलेंनीनाशिकमध्ये जाहीर सभेनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आठवलेंनी विरोधकांवर खास शैलीतून टीका केली. 'आम्ही म्हाविकास आघाडीला देत आहोत अशी टक्कर, की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली पाहिजे चक्कर. तीन पक्षांची त्यांची महाविकास आघाडी आहे, विकासाचे नाव काढलं पाहिजे ती महाआघाडी आहे, असा शब्दातील चारोळीतून आठवलेंनी विरोधकांना टोला लगावला.

Pune Crime News : वानवडीत सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

संजय राऊतांच्या भाजपवरील आरोपांवर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या रोड शोचा खर्च काढला पाहिजे. त्यांनी खर्च भरला तर आम्ही देखील भरू'काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगा तपासण्या आल्या होत्या. यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'मुख्यमंत्री शिंदे हे जबाबदार व्यक्ती आहे. ते हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा घेऊन जातील असे अजिबात नाही. फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आरोप केला आहे. पैशांचा बॅगा वाटण्याचा संबंध येत नाही. आम्हाला पैसे वाटायची गरज नाही'.

एनडीए किती जागा मिळणार?

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात किती जागा मिळतील, यावर आठवलेंनी भाष्य केलं. 'संपूर्ण देशात निवडणूक होत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहे. बरेचशे प्रश्न प्रलंबित होते, ते आम्ही पूर्ण केले. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. दक्षिण भारत, तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणी जाऊन आलो. तेलंगणाता ४ जागा भाजपच्या होत्या. त्या वाढतील. उत्तर प्रदेशात ७० ते ७५ जागांचं टार्गेट आहे. ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा आठवलेंनी केला.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply