Ramdas Athawale : उद्धव ठाकरे आघाडीला कंटाळून परत येतील; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

Ramdas Athawale : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेच्या जागावाटपावरही बैठकांचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु असताना, उद्धव ठाकरे आघाडीला कंटाळून ते परत येतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.  

केंद्रीय मंत्री  रामदास आठवले आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान रामदास आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं.

Akola Politics : अकोल्यात बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारच्या शहराध्यक्ष सागर उकंडे यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

उद्धव ठाकरेंवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीवर टीका करणे योग्य नाही. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्या सुपुत्राला मंत्री केलंच होतं. उद्धव ठाकरे परत युतीत आले तर त्यांचं स्वागतच आहे. आम्ही त्यांना सोडलं नव्हतंच. त्यांनी आम्हाला सोडलं. त्यांना आता एकट्याने राहून उपयोग नाही'.

'उद्धव ठाकरेंचे आमदार इकडे आलेलेच आहेत. आता आज ना उद्या महाविकास आघाडीला कंटाळून ते परत येतील, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply