Ram Satpute : प्रणिती शिंदे मला विजयाचं पत्र सुद्धा लिहितील; अभिनंदनाच्या पत्रावर राम सातपुतेंचं प्रत्युत्तर

Ram Satpute : एका सर्वसामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या प्रॉपर्टीचा हिशोब मागणाऱ्या माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी गेल्या 40 वर्षांतील प्रॉपर्टीचा आधी हिशोब द्यावा, अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केली आहे.

राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. काल रात्री आमदार सातपुते यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना राम सातपुते यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे व त्यांचे पिता सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Government Employee : शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय

आमदार सातपुते म्हणाले, मी एका ऊस तोड करणाऱ्या कामगाराचा मुलगा आहे. सामान्य कुटुंबातून आलो आहे. मी बीटेक आहे. माझी बायको देखील बीटेक इंजिनिअर झाली आहे. तिची आयटी कंपनी आहे. आम्ही कर्ज काढून घर बांधलं आहे. मी माझं प्रॉपर्टीचा हिशोब देतो, सुशिलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या प्रॉपर्टीचा हिशोबा द्यावा. काँग्रेस उमेदवाराला माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यात आहे हे अजून ही माहिती नाही. मी मराठी शाळेत शिकलोय. तुम्ही कॉन्वेन्ट शाळेत शिकून काय फायदा असा चिमटाही काढला आहे.

ही निवडणूक थेट ऊस तोड कामगारांचा एक मुलगा विरूध्द माजी मुख्यमंत्र्याची मुलगी अशी आहे. माळशिरस तालुक्यात केलेलं काम पाहून सोलापूरची जनता मला निवडून देईल याचा मला विश्वास आहे. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी जसं अभिनंदनाचे पत्र लिहिले तसंच चार जून रोजी देखील विजयाचं पत्र त्या मला लिहितील असा उपरोधिक टोला‌ ही त्यांनी लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply