
Ram Mandir Darshan : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मोठी घोषणा केली. येत्या ८ महिन्यात राज्यातील १५ लाख भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचे आहे. देशातील सर्वात मोठी दिवाळी २२ जानेवारी २०२४ रोजी साजरी होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’ या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच नोंद झाली. हा विश्वविक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला.
|
|
यावेळी बावनकुळे बोलत होते. कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
येत्या ८ महिन्यात राज्यातील १५ लाख भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिरात दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी राजेश पांडे यांना दिल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशात राबविलेला ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम देशासाठी बलिदान दिलेल्यांना समर्पित आहे".
"या उपक्रमात देशातील एक कोटी ४० लाख नागरिक सहभागी झाले. तर या उपक्रमातंर्गत राज्यात झालेला ‘सेल्फी विथ मेरी माटी’चा विश्वविक्रम कौतुकास्पद आहे.’’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी पाटील यांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाच्या विश्वविक्रमाद्वारे आपण चीनला मागे टाकल्याचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात विश्वविक्रम नोंदविण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ‘‘या विश्वविक्रमासाठी जवळपास २५ लाख नागरिकांनी सेल्फी पाठविले होते. त्यातील जवळपास १० लाख ४२ हजार सेल्फी विश्वविक्रमासाठी ग्राह्य धरण्यात आले’’, अशी माहिती पांडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

