Ram Mandir : पुण्यातील मराठी उद्योजकाला अयोध्येत पुढील १५ वर्षांसाठी सेवा देण्याची मिळाली संधी

Ram Mandir : पुण्यातील मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीला देश अयोध्येतील पहिले चार मजली मल्टिलेव्हल पार्किंग चालवण्याचे काम मिळाले आहे. तसेच येथील फूडकोर्ट आणि रूफटॉप रेस्टॉरंटही चालवण्याचे कामही मिळाले आहे.

या कामाचा कालावधी पुढील १५ वर्षांसाठी असणार आहे. देशातील अनेक कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. परंतु ‘स्मार्ट सर्विसेस’ला ही निविदा मिळाली आहे.

PM Modi Speech : 'अखेर तो क्षण आला, मी प्रभू रामांची माफी मागतो, कारण..' पंतप्रधान मोदी भावूक

वाहनतळात ५०० चारचाकी गाड्या, तर एक हजार दुचाकी वाहने लावण्याची क्षमता आहे. या वाहनतळाच्या इमारतीवर रूफटॉप रेस्टॉरंट असणार आहे. त्याचप्रमाणे बाजूला सुमारे ५० हजार चौरस फुटांची मोकळी जागा असून याठिकाणी २८ फूडकोर्टचे बांधकाम सुरू आहे.

गेल्या १४ वर्षांपासून सेवा

देणाऱ्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची महाराष्ट्रासह राजस्थान, तेलंगण, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही विविध कामे सुरू आहेत. नफा हा उद्देश न ठेवता श्रीरामाची सेवा यानिमित्ताने करायला मिळणार असल्याचा आनंद आहे, असे मत ‘स्मार्ट सर्व्हिसेस’चे संचालक चंद्रकांत गायकवाड यांनी व्यक्त केले.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply