Rajya Sabha Election date : महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, तारीख जाहीर

Rajya Sabha Election date : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होईल. रिक्त होणाऱ्या ५६ पैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत.

राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी  निवडणुका घेण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं सोमवारी ही घोषणा केली. १३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तर दोन राज्यांतील उर्वरित ६ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिलला संपणार आहे.

ज्या १५ राज्यांत राज्यसभा निवडणुका होणार आहेत, त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. राज्यसभा सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून करण्यात येते.

 

थोडक्यात महत्वाचे :

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला होणार निवडणूक

निवडणूक आयोगाकडून घोषणा

२७ फेब्रुवारीला मतदान होणार, त्याच दिवशी होणार मतमोजणी

देशातील एकूण ५६ खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे

महाराष्ट्रातील ६ खासदारांचाही कार्यकाळ संपतोय

महाराष्ट्रातील खासदारांची नावं पुढीलप्रमाणे

कुमार केतकर, काँग्रेस

वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

प्रकाश जावडेकर, भाजप

मुरलीधरन, भाजप

नारायण राणे, भाजप

अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply