PBKS vs RCB : रजत पाटीदारने रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

Rajat Patidar’s record for RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटचा बोलबाला असला, तरी या संघात आणखी एक फलंदाज आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो खेळाडू रजत पाटीदार आहे, जो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्फोटक उजव्या हाताच्या फलंदाजाने पंजाब किंग्जविरुद्ध २३ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. पाटीदार धर्मशाळेच्या खेळपट्टीवर उतरताच दमदार फटकेबाजी सुरु केली. त्याने आपल्या खेळीत ६ षटकार आणि ३ चौकार लगावले. या खेळीदरम्यान पाटीदारने एक मोठा विक्रमही मोडला.

रजत पाटीदारची विक्रमी खेळी –

या खेळीच्या जोरावर रजत पाटीदारने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे जो साध्य करणे अजिबात सोपे नाही. खरेतर, रजत पाटीदार हा आरसीबीचा एकमेव खेळाडू ठरला आहे, ज्याच्या बॅटने २१ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत तीन अर्धशतके झळकावली आहेत. पाटीदारने या मोसमात तिन्ही अर्धशतके झळकावली आहेत. पाटीदारने हैदराबादविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर या खेळाडूने केकेआरविरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक केले.

PBKS Vs RCB : पंजाबची धाव प्राथमिक फेरीपुरतीच; बंगळुरूचा मोठा विजय

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply