IPL सुरु होण्याआधीच राजस्थानला धक्का! स्टार फिरकीपटू संपूर्ण हंगामातून बाहेर, मुंबईच्या खेळाडूला संधी

Rajasthan Royals News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा काही तासांवर आलेली असताना राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बदल आहे. राजस्थान संघाचा सदस्य असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झाम्पाने संपूर्ण हंगामातून माघार घेतली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने झाम्पाला 1.5 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात कायम ठेवले होते. ऑस्ट्रेलिया संघाचा पुढील स्पर्धा कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे त्याने माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तरी त्याने वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे.

राजस्थान संघासाठी हा दुसरा धक्का आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने अगोदरच दुखापतीमुळे माघार घेतलेली आहे.

BCCI चे टेंशन वाढले! आयपीएल काही तासांवर असतानाच पंजाबचे नवीन स्टेडियम संकटात

झाम्पा याला ऑस्ट्रेलियाच्या केवळ मर्यादित षटकांच्या प्रकारातील संघात स्थान दिले जाते; परंतु तिन्ही प्रकारांत खेळणारे आणि त्यातही वेगवान गोलंदाज असलेले पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क मात्र आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्याचमुळे झाम्पाची माघार चर्चेचा विषय ठरत आहे.

झाम्पाच्या माघारीमुळे राजस्थानच्या फिरकी संघाची मदार आर. अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यावरच असेल. झाम्पा गत मोसमात सहा सामने खेळला. त्यात त्याला 23.50 च्या सरासरीने आठ विकेट मिळवता आल्या होत्या.

बदली खेळाडू

आता राजस्थानने झाम्पाच्या जागेवर 25 वर्षीय तनुष कोटीयनला संघात स्थान दिले आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळणारा तनुष यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याने 502 धावा आणि 29 विकेट्सही घेतल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply