Raj Thackeray News : टोल महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा; राज ठाकरेंकडून राज्यकर्त्यांच्या वक्तव्यांची व्हिडिओद्वारे 'टोल'खोल

Raj Thackeray News : टोलदरवाढीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी उपोषण पुकारले होते. मनसे अध्यक्षांनी भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेतले. आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

राज ठाकरेंचे लाव रे तो व्हिडिओ...

टोलदरवाढीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी याच मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेतअजित पवार  देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांच्या टोलदर कमी करण्याबाबतच्या वक्तव्यांचे व्हिडिओच दाखवले.

Pimpri Chinchwad Fire : आगीच्या भयंकर घटनेनं पिंपरी-चिंचवड हादरलं; स्फोटांच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली

तर टोल जाळून टाकू...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टोलबंदी असल्याचे वक्तव्य केले होते. हाच व्हिडिओ दाखवत त्यांनी फडणवीस धादांत खोटे बोलत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच टोलनाक्यावर यापुढे गाड्या अडवल्या तर टोल जाळून टाकू.. असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

टोलस्कॅमची चौकशी झाली पाहिजे..

तसेच यावेळी बोलताना राज ठाकरेंनी "टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्याच कंपन्यांना टोलचं कंत्राट कसं मिळतं ? असे सवाल उपस्थित करत नेते आपल्याला लुबाडतात, हे जनतेला कळत नाही का? टोल हा मोठा घोटाळा आहे, राज्यातील या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे.." अशी मागणीही त्यांनी केली. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply