Raj Thackeray and Eknath Shinde Meet : राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट, राजकारणात नव्या युतीची नांदी?

Raj Thackeray and Eknath Shinde Meet : मागील काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे  आणि  यांच्या वारंवार भेटीगाठी होताना पाहायला मिळतंय.  गुरुवार 28 डिसेंबर रोजी देखील जनतेचे काही विषय घेऊन दोन्ही दिग्गज नेते भेटले.  या भेटीमागे आगामी काळातील युतीची नांदी तर नाही अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागलीये. कारण जनतेच्या विषयावर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड देखील चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. 

या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटींचं सत्र सुरु आहे. पण तरीही या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नसल्याचं सांगितलं जात असलं तरीही आगामी काळात शिंदे गट आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गणपतीत एकनाथ शिंदे यांनी शिवतिर्थावर जाऊन राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथून या सर्व चर्चांना सुरुवात झाली. पण त्यानंतर अनेकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात औपचारिक आणि अनपौचारिक अनेक भेटी झाल्या. या भेटीमागे नेमकी कारणं काय होती हे अद्यापही समोर आलेलं नाही. 

Thane News : ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ; घटनास्थळी बॉम्ब स्कॉड दाखल

 ठाकरे -शिंदे भेटीतून नव्या युतीची नांदी?

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटी सातत्याने पाहिला मिळाल्या. कधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सदिच्छा भेट तर कधी मनसे दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर हजेरी, कधी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने तर कधी जनतेचे विषयांवर चर्चा करण्यासाठी. या सगळ्या भेटींमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये होणारी बंद दाराआड चर्चा हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. आता आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची वर्षा वर भेट झाली आणि हेच कारण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेसाठी कारण ठरलं आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply