Raj Thackeray : राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना हस्तलिखीत चिठ्ठी; सर्वच पक्षांनी आदर्श घ्यावा असा संदेश

Raj Thackeray : राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तयारी करत आहे. राज ठाकरे कालपासून (५ मार्च) आढावा बैठका घेत आहेत. या बैठका आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आहेत. राज ठाकरे  प्रत्येक विधानसभेत जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. या बैठकांदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलं आहे. 

राज ठाकरे यांनी काल उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात आढावा सुरु केलेला आहे. हा आढावा सुरु असताना त्यांनी प्रत्येक विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना संदेश दिला  आहे.

Lonavala Crime News : वेताळबाबा टेकडीवर पाेलिसांचा छापा, जुगार खेळणा-या नऊ जणांना अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संदेश

यामध्ये त्यांनी म्हटलंय, सस्नेह जय महाराष्ट्र. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांला भावासारख जपा! कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, सहकारी म्हणा! असा संदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांनी दिला  आहे.

हा संदेश त्यांनी एका हस्तलिखित चिठ्ठीतून दिला आहे. या चिठ्ठीवर त्यांची स्वाक्षरी देखील आहे. त्यांनी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांना भावाप्रमाणे वागविण्याचे आवाहन केलं  आहे. सर्वच पक्षांनी आदर्श घ्यावा असा संदेश त्यांनी या चिठ्ठीतून दिला आहे.

लोकसभा मतदारसंघाचा आढावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आता राज ठाकरे वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील मनसे पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत.

वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply