Raj Thackeray : पुणे शहर बरबाद व्हायला जास्त वेळ लागणार नाही, राज ठाकरेंचा गंभीर इशारा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पु्ण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा राज ठाकरे   यांनी दिला आहे.पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते.

राज्यात राजकारणापलिकडे पाहण्याची गरज आहे. राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. १९९५ च्या आधीचा महाराष्ट्र आणि नंतरचा महाराष्ट्र असा लेख लिहावा वाटतंय. दरम्यान पुणे देखील खूप बदललं आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला पण पुणे बरबाद व्हायला वेळ नाही लागणार, असा इशाला राज ठाकरे यांनी दिला. 

बदलाच्या वेगात चित्रपट बदलले, नाटक, साहित्य, राजकारण बदललं. बदल हा गरजेचा असतो पण तोच बदलआपल्या जीवावर उठणार असेल तर त्याचं काय करायचं, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

१९९५ नंतर खूप मोठा वर्ग राजकारणाला तुच्छ मानायला लागला. विचार करणारा मोठा वर्ग राजकारणापासून दूर जाऊ लागला. त्यामुळे राजकारणाचा स्थर बिघडू लागला. १९९५ आधी आणि ९५ नंतरचा भ्रष्टाचाराचा स्थर यात मोठा फरक आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. तुमचं अख्ख आयुष्य राजकारणाला बांधील आहे. तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टीचे भाव राजकारणी ठरवतात, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

जे पदरात पडतंय तुम्ही निमुटपणे सहन करताय. राजकारण गलिच्छ आहे, फक्त असं तुम्ही म्हणता. मात्र तुमचं गप्प राहणं याने आपला आजूबाजूचा परिसर बर्बाद होतोय. आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही शांत न बसता प्रश्न विचारले पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply