Rain Update : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार... मुंबई-कोकणासाठी धोक्याची घंटा! रेल्वेसेवा विस्कळीत, महामार्ग बंद

Rain Update : आज पहाटे पासून राज्यातील अनेक शहरांना पावसाचा फटका बसला. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाऊस झाला. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातील आंबेडकर रोड या ठिकाणी दुकानांत पाणी शिरल्यामुळे नुक़सान झालं आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे

किल्ले रायगडावर ढग फुटी प्रमाणे पाऊस-

रविवारी संध्याकाळी किल्ले रायगडावर ढग फुटी प्रमाणे पाऊस झाला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पर्यटकांना अडचणीत येत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्यात आली.

Mumbai Rains: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, CM शिंदेंनी केले आवाहन !

रेल्वेसेवा विस्कळीत

मुंबईत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. केवळ ठाणे ते कल्याण या ठिकाणी सेवा सुरु आहे. मागील एक तासापासून सेवा चंद आहे. कर्जत, कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू आहे. कर्जत बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक माझ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply