Rain Forecast in Maharashtra : राज्यात उद्या कसा असेल पाऊस, पुण्यासह ७ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Rain Update : मागील आठवडाभर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात आज पावसाने उघडीप घेतली. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेल्या पाहायल मिळाला आहे. हवामान विभागाने तसा अंदाजही दिला होता. उद्या राज्यभरात पावसाचं प्रमाण कसं असेल यावर एक नजर टाकूया.

मुंबई, ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुण्यातील काही भागात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी कमी झाली आहे, त्यामुळे पुराचा धोका टळला आहे. मात्र उद्या कोल्हापुरातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

PM Modi Pune Visit: PM मोदीचा पुणे दौरा, श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं घेणार दर्शन

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील हवामान उद्या कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर १६ जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर ७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply