Rain Alert : उत्तर भारतातून मान्सूनची माघार, दक्षिण भारतात मात्र पावसाळा; या भागात पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता

Rain Alert : उत्तर भारतातून आज मान्सूनने पूर्ण माघार घेतली आहे. उत्तर भारतात आता आकाश निरभ्र असलं तरी दक्षिण भारतात पावसात मात्र नवीन पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि पूर्व व उत्तर-पूर्व दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.

दक्षिण बंगालच्या उपसागरात मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तामिळनाडू आणि पुदुचेरी, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि केरळ येथे हलक्या ते मध्यम पावसासह अनेक ठिकाणी पाऊस झाला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.

Bopdev Ghat Case : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दुसरा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात! उत्तर प्रदेशातून केली अटक

माॅन्सूनने यंदा सरासरी वेळेपेक्षा उशीराने परतीचा प्रवास सुरू केला. माघारी मान्सूनचा २३ सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर अनेक दिवसांचे मुक्काम करत अखेर आज माॅन्सूनने देशाचा निरोप घेतला. मान्सूनचा परतीचा प्रवास उशीरा सुरु झाला तरी माॅन्सूनने वेळेत देशाचा निरोप घेतला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी निरोप घेतल्यानंतर आज दक्षिण द्विपकल्पात ईशान्य मान्सून सक्रिय झाला.

हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शुक्रवारी राज्यातील आणखी काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply