Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Railway Crime : रेल्वे स्थानक व रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने सापळा रचत बेड्या ठोकल्या. हे चौघे मूळचे तामिळनाडू येथील राहणारे आहेत ते फक्त चोरी करण्यासाठी गावाबाहेर पडत असल्याचे समोर आले असून पोलिसानं त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

सत्यराज ओंथुरगा, कृष्णा गणेश, शक्तीवेल अवालुडन, गणेश सेल्वम अशी अटक आरोपींची नावे आहेत काही दिवसांपूर्वी  डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका प्रवासाच्या मोबाईल चोरी प्रकरणात सत्यराज ओंथुरगा या चोरट्याला ताब्यात घेतले होते. डोंबिवली रेल्वे पोलिसांकडून सध्याचे चौकशी सुरू होते. तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच देखील या प्रकरणाचा तपास करत होते. सत्यराजने दिलेला कल्याण क्राईम ब्रँच तपास करत होती. मध्य रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक अर्षद शेख, पोलीस अधिकारी प्रकाश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला. 

Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

तपासा दरम्यान पोलिसांना सत्यराजचे साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सापळा रचला. चोरी करण्यास आलेले कृष्णा गणेश, शक्तीवेल अवालुडन, गणेश सेल्वम याला अटक केली. यांच्याकडून प्रवाशांकडून लुटलेले ११ महागडे मोबाईल व एक लॅपटॉप हस्तगत केला. ही टोळी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. तेलंगणा आणि इतर राज्यात देखील रेल्वे स्थानकातील प्रवाशांना लक्ष करते होती. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकिसस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply