Raigad News : अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Raigad News : शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता माणगाव पोलिसांनी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. माणगाव पोलिसांकडून  या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अनिल नवगणे यांच्या कारवर गुरुवारी रात्रीVअनिल नवगणे हे थोडक्यात बचावले पण त्यांचा चालक जखमी झाला. हा हल्ला विकास गोगावले यांनी केला असल्याचा आरोप अनिल नवगणे यांनी केला होता. हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हे घटनास्थळी हजर असल्याचे नवगणे यांनी सांगितले होते.

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

या घटनेनंतर रात्री उशिरा अनिल नवगणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, महाडमध्ये गुरूवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा होती. या सभेला अनिल नवगणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले होते. या सभेत भाषण करताना त्यांनी भरत गोगावले यांच्यासह त्यांचा मुलगा विकासवर गंभीर आरोप केले होते. सभा झाल्यानंतर ते इंदापूर येथील घराच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान त्याच्या कारवर काही अज्ञातांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला केला आणि दगडफेक केली. चालकाने कार पळवली त्यामुळे ते बचावले. या घटनेत नवगणे सुखरूप आहेत पण त्यांचा चालक जखमी झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply