Raigad News : प्रतापगडावर सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा; पालक चिंतेत

Raigad News : रायगडमधून  एक मोठी बातमी समोर आली आहे. सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे ही घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेले नाशिकमधील रहिवासी आहेत. त्यांच्या शाळेची सहल प्रतापगड, रायगडला आली होती. सहलीला गड फिरण्यासाठी ही मुलं फार उत्सुक होती. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गड पाहिला तसेच येथील इतिहासाची माहिती जाणून घेतली.

Madras Court On Mandir : 'हा काही पिकनिक स्पॉट नाही...', मंदिरांमध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर मद्रास हायकोर्टाची टिप्पणी

त्यानंतर ३० जानेवारीला रात्रीचं जेवण केलं आणि मुलं झोपली. मात्र रात्रीतूनच विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. शिक्षकांना ही माहिती समजताच त्यांनी आज सकाळी विद्यार्थ्यांना उपचाराकरता पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असल्याने डॉक्टरांनी डिसचार्ज दिला आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply