Raigad : किल्ले रायगडावर मोठी दुर्घटना; विद्युत रोषणाई करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

रायगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. सजावटीचे काम करताना राजदरबार येथे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे.

यासाठी गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गड किल्ल्यांची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या डागडुजीची कामे सुरु झाली आहेत. काही गडांवर सजावटीच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडणार आहे. याठिकाणी सध्या सजावटीचे काम सुरु आहे. हे काम करताना गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही व्यक्तींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यातील एका व्यक्तीला विजेचा तीव्र झटका बसला. शॉक लागल्याने तो जागीच कोसळला.

शॉक लागून व्यक्ती खाली पडल्यावर त्याला वाचवण्यासाठी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषीत केले. पुढे त्याचा मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. मृत कामगाराचे नाव आणि ओळख अद्याप समजू शकलेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply