Raigad Landslide : आमची लेकरं कुठे गेली हो.., मुलांना शोधण्यासाठी आई-वडिलांची धावाधाव; इर्शाळवाडीत आक्रोश

Raigad Khalapur irshalwadi : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत २० ते २५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

पाऊस सुरू असल्याने बचावकार्याला अडथळा येत आहे. घटनास्थळी सध्या अतिशय शोकाकूल वातावरण आहे. हे गाव दरडीखाली दबलं गेल्याने शेजारच्या गावातील लोक आपल्या नातेवाईकांच्या काळजीपोटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथामिक माहितीनुसार, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या १०० नागरिकांमध्ये १५ ते २० लहान मुलांचा समावेश आहे.

कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. जीवाचा आकांत करुन लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदलापूरहून एक व्यक्ती इर्शाळवाडीत दाखल झाली आहे. त्यांची मुलगी या गावात राहते. तिच्या काळजी पोटी ते इर्शाळवाडीत पोहोचले आहेत.

आपल्या कुटुंबियांच्या काळजीनं अनेकजण कासावीस झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांकडे हे लोक सातत्यानं आपल्या आप्टेष्टांबाबत विचारणा करत आहेत. आमचे नातेवाईक कुठे आहेत? ते कसे आहेत? त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला वरती जाऊ द्या, अशी विवंचना वारंवार पोलिसांकडे करत आहेत.

Eknath Shinde On Khalapur Landslide : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

एका महिलेने आपली लेकरं या घटनेत दबली असल्याचं सांगितलं आहे. आमच्या कुटुंबातील ७ जण बेपत्ता असल्याचं या महिलेनं सांगितलं आहे. घटनास्थळापासून ३-४ किमी अंतरावर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही वाहनाला आत सोडलं जात नाही. गर्दी होत असल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. जवळपास ४० रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात असून त्यातील निम्म्या आत सोडल्या आहेत, तर बाकीच्या बाहेरच आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply