Irshalgad Landslide : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ३ सख्ख्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबातील इतर सदस्यांचाही शोध लागेना!

Raigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहे. याच गावामध्ये एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भगवान तिरकड (वय २७ वर्ष) दिनेश तिरकड (वय २५ वर्ष) व कृष्णा (वय २३ वर्ष) अशी या तिघा भावडांची नावे आहेत.

तिरकड कुटुंबातीले हे तिन्ही भाऊ पोलीस दलात होमगार्डची ड्युटी बजावित होते. ते खालापूर व खोपोली पोलीस ठाण्याअंतर्गत आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्या कुटुंबातील इतर ९ सदस्य अजूनही बेपत्ताच असल्याची माहिती आहे.

यातील दिनेश हा विवाहित होता. दिनेशची पत्नी व दोन मुले त्याचे दोन भाऊ असे कुटुंबातील सर्वजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. या तिघा भावंडांचा मृत्यू  झाल्याची माहिती शेजारच्यांनी माध्यमांना दिली.

तिरकड कुटुंबियांच्या शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान, दिनेश आणि कृष्णा हे तिघेही भाऊ कामावरुन परतल्यावर आपल्या मोटारसायकली पायथ्यावरील मोनिवली गावात परिचिताच्या घराजवळ लावत डोंगरावरील घरात जात असत.

बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे परतले होते. मात्र काळाने त्यांच्यासह कुटुंबातील सर्वांना ओढून नेले. त्यांच्या कुटुंबियांचा अजूनही शोध लागला नाही. तिरकड कुटुंबिय सुखरूप बाहेर निघावे, अशी आम्ही प्रार्थना करतो, असंही शेजारील नागरिक म्हणाले.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमधील ग्रामस्थांच्या मदतीला ‘लालबागचा राजा’ निघाला; आज मोठी मदत घेऊन रवाना होणार

बचावपथकाकडून शोधकार्य सुरूच

दरम्यान, इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अजूनही अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती आहे. या गावातील १५० लोकांचा अजूनही शोध लागत नसल्याने हे लोक ढिगाऱ्याखाली दबले तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी युद्धपातळीवर शोधकार्य हाती घेण्यात आलं असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply