Raigad Accident : भरधाव आल्याने जोरात धडक, कंटेनर कारवर पलटी, एकाचा जागीच अंत; रायगडमध्ये भीषण अपघात

Raigad : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पेण-पनवेल मार्गावर या भीषण अपघाताची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.

ठाण्यावरुन वडखळकडे जाणाऱ्या एका कारला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कंटेनर थेट कारवर उलटला. या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामध्ये एकाचा जागीच मृ्त्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. पनवेल पोलिस स्टेशन हद्दीत कर्नाळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. हा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली

कारचा झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांपैकी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील महिला गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना वाहनाच्या बाहेर काढलं आणि त्यांनी तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्या व्यक्तीला मृत घोषित केलं. हायड्राच्या साहाय्याने कारवर उलटलेला कंटेनर बाजूला काढण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply