Raigad Accident : बाईकने ट्रिपल सीट करत होते प्रवास, भरधाव स्कूलबसने दिली धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Raigad Accident : रायगड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगडच्या पाली खोपोली मार्गावर हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परळीजवळ कानसळ गावाजवळ स्कूलबसने बाईकला समोरून धडक दिली. या बाईकवर तीन जण प्रवास करत होते.

बसने धडक देताच हे तिघेजण गाडीवरून फेकले गेले आणि गंभीर दुखापत होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तिघांचे मृतदेह जांभूळपाडा प्राथमिक केंद्रात आणण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Crime : मुंबई हादरली! शेजारी राहणाऱ्या आजोबानेच केला घात, चाकू गळ्यावर ठेवत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, रायगडच्या पाली खोपोली मार्गावर बस जात असताना समोरून अचानक एक बाईक येते. या बाईकला बस जोरदार धडक देताना या व्हिडिओत दिसत आहे. या बाईकवर तीनजण प्रवास करत होते. बसच्या मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply