Rahul Kanal Decision : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय शिंदे गटाच्या वाटेवर

Thackeray Group : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या 1 जुलै रोजी ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गट एकापाठोपाठ ठाकरे गटाला धक्के देत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत. अशामध्ये ठाकरे गटाकडून सावध पाऊल उचलण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कनाल  शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटाचे सावध पाऊल उचलले आहे. राहुल कनाल यांच्या विभागातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधील युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हे आदेश काढण्यात आले आहेत.

3D Printed Temple : तेलंगणामध्ये तयार होतंय जगातील पहिलं थ्री-डी प्रिंटेड हिंदू मंदिर;

आदित्य ठाकरे 1 जुलै रोजी म्हणजे उद्या मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याच दिवशी शिंदे गट त्यांना जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरेंचे चांगले मित्र राहुल कनाल हे शिंदे गटामध्ये उद्याच प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. राहुल कनाल हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अशामध्ये त्यांनी काही महिन्यांपूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रुप देखील सोडला होता. अंतर्गत वादाला कंटाळून त्यांना हा ग्रुप सोडला असल्याचे बोलले जात होते.
 
राहुल कनाल हे शिवसेनेत येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा राहुल कनाल यांची शिर्डी संस्थानावर विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. अशामध्ये आता राहुल कनाल यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असून ते लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी युवासेनेचे नेते अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवासेना सोडली होती.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या विधानपरिषद सदस्या आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करत मोठा धक्का दिला होता. दोघी देखील ठाकरे गटामध्ये नाराज असल्याचे त्यांनी सांगितले होते. ठाकरे गटातील नेत्यांचे शिंदे गटात प्रवेश करण्याचे सत्र सुरुच आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply