Rahul Gandhi : भारतात EVM म्हणजे 'ब्लॅक बॉक्स', लोकशाहीचा फक्त दिखावा; मुंबईतील प्रकारानंतर राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर रविंद्र वायकरांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.

राहुल गांधींची पोस्ट काय?

भारतातील ईव्हीएम हा एक 'ब्लॅक बॉक्स'आहे. कोणालाही त्यांची छाननी करण्याची परवानगी नसल्याचं राहुल गांधींनी  म्हटलं आहे. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही फक्त दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते, असं राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra Politics : 'चारशे नव्हे, ५०० पार गेले तरी 'हिंदूराष्ट्र' घोषित करू शकत नाही', अमोल मिटकरींनी भाजप आमदाराला सुनावले!

 
एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भातले आरोप होत आहेत, तर दुसरीकडे टेस्ला आणि एक्सचे मालक एलन मस्क यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात एक पोस्ट करत चिंता व्यक्त केली. एलन मस्क  यांनी म्हटलंय, 'ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत. कारण मानवी हस्तक्षेपाने ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे.


एलन मस्क यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल गांधीयांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील घटनेचा दाखला दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply