Rahul Gandhi : कॉंग्रेसला सत्ता दिल्यास महिलांना सक्षम करू; राहुल गांधींचे आश्‍वासन !

Rahul Gandhi : तेलंगणात कॉंग्रेसचे सरकार आल्यास सामाजिक पेन्शन, एलपीजी गॅस सिलिंडरवर अंशदान आणि सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाच्या माध्यमातून राज्यातील महिलांना ४ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळेल. प्रत्येक महिन्याकाठी महिलांच्या खात्यात सामाजिक पेन्शन म्हणून अडीच हजार रुपये जमा केली जातील.

एलपीजी गॅस सिलिंडरवर पाचशे रुपयांचे अनुदान मिळेल आणि सरकारी बसच्या माध्यमातून एक हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली जाईल, अशी घोषणा आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते.

Pune Fire News : पुण्याच्या रास्ता पेठेतील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात आग; शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान जळून खाक

कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ अंबटिपल्ली गावात आयोजित सभेत बोलताना त्यांनी बीआरएस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘‘ तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कथितरित्या केलेली राज्याची लुट परत मिळवून देण्याचा कॉंग्रेसने निर्धार केला आहे. तेलंगणात कॉंग्रेसचे सरकार आले तर महिलांना चार हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या लुटीने तेलंगणाच्या महिलांना सर्वाधिक फटका बसला आहे.

यानुसार एक लाख कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप करत ते म्हणाले, बीआरएस. भाजप आणि एमआयएम हे एकत्रपणे लढत आहेत. मात्र खरा मुकाबला कॉंग्रेस आणि केसीआर यांच्यातच आहे. एमआयएम आणि भाजप हे बीआरएसला छुपा पाठिंबा देत आहेत. त्यामुळे या दुटप्पी सरकारला हटविण्यासाठी कॉंग्रेसला पाठिंबा द्या. राहुल गांधी यावेळी कालेश्‍वरम प्रकल्पातून केसीआर यांनी मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असल्याचा आरोप केला. ही योजना केसीआर यांच्यासाठी एटीएमप्रमाणे आहे. ही मशिन सुरू ठेवण्यासाठी तेलंगणातील सर्व कुटुंबांना २०४० पर्यंत वार्षिक ३१,५०० रुपये खर्च करावे लागतील, असेही सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply