Weather update : पुणे शहरात देखील उन्हाच्या झळा वाढू लागल्या

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी पारा ४० अंशांच्या पुढे गेला असून पुणे शहरात देखील उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत असून ढगाळ वातावरणाचे सावट देखील अधूनमधून पडत आहे.

दरम्यान बुधवारनंतर (ता. १९) पुणे शहरातील कमाल तापमानाचा पारा हा चाळिशी पार पोहचण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्‍यामुळे उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे. पुणे शहरात मंगळवारी (ता. १८) ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. दिवसा वाढलेल्या तापमानामुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.

त्यात उन्हाचा ताप असाह्य झाल्याने घराबाहेर पडणे सुद्धा आरोग्यास धोक्याचे ठरत आहे. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तापमानात सरासरीपेक्षा काहीशी घट झाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply