Pune Water Supply : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या गुरुवारी 'या' भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

Pune  : पर्वती जलकेंद्राअंतर्गत ६०० मिलिमीटर जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबविण्यासाठी येत्या गुरुवारी (२५ जुलै) शहराच्या पूर्व भागातील काही पेठा व लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे; तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पर्वती जलकेंद्रातील टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीत स्वारगेट मेट्रो स्टेशन समोरच्या बाजूस मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. ही गळती थांबविण्यासाठी येत्या गुरुवारी काम केले जाणार आहे. त्यामुळे या वाहिनीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

Maval News : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! गर्भपात करताना महिलेचा मृत्यू, मृतदेहासह २ मुलांना इंद्रायणी नदीत जिवंत फेकले

शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीजमागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकिज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी इत्यादी.

जिल्ह्यात काही धरणांच्या पातळीत वाढ

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात १५.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५२.१७ टक्के पाणी जमा झाले आहे. म्हणजेच धरणात गेल्या २२ दिवसांत सुमारे साडेअकरा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाल्याने त्या भागातील धरणांमधील पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणे निम्मी भरली आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे धरणात अद्याप पाण्याचा साठा कमीच आहे. उजनी धरणात एक जूनपासून २५५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणात उणे पाणीसाठा असण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता उणे २२.३१ टक्के पाणीसाठा आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply