Pune water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्यासंदर्भात महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पार्वती जलकेंद्रात विद्युत विभागाला दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरुवारी शहरातील काही भागात पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार आहे. 

पुणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गुरुवारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून पार्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहेत. यामुळे पुण्यातील विविध भागात गुरुवारी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा येणार आहे.

पार्वती सबस्टेशन येथे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याने पार्वती MLR टाकी परिसर, पार्वती HLR टाकी परिसर व पार्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परीसर, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर.

Mumbai Mantralaya : अप्पर वैतरणा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन, संरक्षण जाळीवर उड्या

तसेच वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर, एस.एन.डी.टी. (एच. एल. आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, व कोंढवे धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र व परिसर बंद राहणार आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणाची पंपिंग यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे.

यामुळे उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply