Pune Water News : पुणेकरांचं टेन्शन वाढलं, धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला; किती दिवस पाणी पुरेल?

Pune Water News : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये केवळ ४५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक उरला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे.

पुणे शहराला खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये केवळ १०.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

Pune Crime : आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १० जण अटकेत

गतवर्षीच्या आजच्या तारखेला शहराला पाणीपुरवठा ४ धरणांमध्ये मिळून एकूण १२.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा या धरणांमधील एकूण पाणीसाठा हा २.६२ टीएमसीने कमी झाला आहे.

पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, दौंड शहरासाठी आणि शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास, पुणे शहराला जेमतेम ४५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या मे आणि जून या दोन महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७० टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते.

धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा (टक्केवारी)

  • टेमघर - ७.८६ टक्के

  • वरसगाव- ४०.२७ टक्के

  • पानशेत - ३४.५३ टक्के

  • खडकवासला - ५४.९४ टक्के

  • एकूण - ३५.०४ टक्के

टँकरवर अवलंबून असलेली तालुकानिहाय लोकसंख्या

  • पुरंदर --- ९६ हजार ६९९

  • आंबेगाव --- २० हजार ७३९

  • बारामती --- ३१ हजार ६८७

  • भोर --- २ हजार २६१

  • दौंड --- ८ हजार ४४३

  • हवेली --- ४ हजार ६८२

  • इंदापूर --- ७ हजार २५०

  • जुन्नर --- १८ हजार ४२०

  • खेड --- ७ हजार ५३७

  • शिरूर --- २५ हजार २९७

  • एकूण --- २ लाख २३ हजार १५



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply