Pune Water News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Supply: पुण्यात गुरुवारी काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठा वितरण पायाभूत व्यवस्थेच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. हरकानगर भवानी पेठेतील जल वाहिनीवर कामाच्या निमित्ताने विविध भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेद्वारे गुरुवार (२६ डिसेंबर) हरकानगर भवानी पेठेत काम केले जाणार आहे. भवानी पेठेतील पार्वती एमएलआर टाकीच्या पाईपलाईनवर ४५० मिमीचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. पालिकेचे कर्मचारी ३०० मिमीचा पाईप ५०० मिमी पाईपला जोडण्याचे कामही करणार आहेत. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहून पुढे शुक्रवारी (२७ डिसेंबर) सकाळी उशिराने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Kalyan Crime : दुकानावर गेली पण परत आलीच नाही, १३ वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; कल्याण हादरले

दरम्यान पुण्यातील पार्वती एमएआर टाकी, शंकरशेठ रोड, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडियम, लक्ष्मीनारायण टॉकीज (मागचा भाग), पार्वती दर्शन (काही भाग), मित्र मंडळ कॉलनी (काही भाग, सारस बाग, खडकमल अली, शिवाजी रोड, मुकुंद नगर, महर्षी नगर (काही भाग), टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज, मीरा आनंद परिसर आणि श्रेयस सोसायटी या भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणी वितरण व्यवस्थेसाठी बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि पाईप कनेक्शन जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे. तेव्हा पाणीपुरवठा होणार नसल्याने पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे

.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply