Vanraj Andekar : आधी गोळीबार, नंतर कोयत्याने वार; जीवघेणा हल्ल्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू

Pune : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री ही घटना घडली आहे. गोळीबाराच्या या हल्ल्यात आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5 राउंड फायर केल्याची प्रथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारात वनराज गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठेत आधी गोळीबार करण्यात आला. नंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्याच्या ते गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेले आंदेकर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai : गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

घरगुती वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याआधी हल्लेखोरांनी येथील चौकाची लाईट घालवली होती. यानंतर वनराज आंदेकर हे एकटेच असल्याचं पाहून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

आंदेकर यांच्या घरी कार्यक्रम होता. त्यांमुळे त्यांच्यासोबत नेहमी असणारे त्यांचे सहकारी यावेळी त्यांच्यासोबत नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या नंतर त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

दरम्यान, पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा केला जात आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply