Pune University : पोह्यामध्ये अळी, उपीटमध्ये केस; पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील किळसवाणा प्रकार समोर

Pune University : पुणे विद्यापीठातून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील भोजनाचा गुणवत्ता ढासळला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारं वृत्त हाती आलं आहे. विद्यापीठातील मेसमध्ये विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी आणि उपीटमध्ये केस आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील विद्यार्थ्यांच्या पोह्यामध्ये अळी आणि उपीटमध्ये केस आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आळा आहे. विद्यार्थी भोजन करत असलेल्या मेसमध्ये प्रकार झाला आहे. सकाळी न्याहारीसाठी तयार केलेल्या पोह्यामध्ये अळी आढळून आली तर उपीटमध्ये केस आढळला आहे. या पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Ravindra Waikar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार?

विद्यापीठाच्या भोजनगृहातील किळसवाण्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर प्रशासनाने प्राध्यापकांचा सामावेश असलेली उपहारगृह आणि भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थ्यांचा सामावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती काय करतेय, असा प्रश्न उपस्थित करत आहे. या प्रकारानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply