Pune : सिंहगड घाट आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाचा आदेश जारी, पर्यायी मार्ग जाहीर

Pune : 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा-२०२६'च्या अनुषंगाने सिंहगड घाट परिसरात सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला.

स्पर्धकांची सुरक्षितता आणि रस्त्यावरील काम सुरळीत पार पाडावे, यासाठी गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट (कोंढणपूर बाजू) हा मार्ग पूर्णपणे बंद केला जाणार आहे. या काळात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिकांची वाहतूकही खोळंबणार आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Pune : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत कारखान्याच्या जमीन व्यवहारात शासनाचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

पर्यायी मार्ग

पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी परिसरातील नागरिकांनी डोणजे चौक-खडकवासला-किरकटवाडी-नांदेड सिटी-वडगाव, धायरीमार्गे (पुणे-बंगळूर महामार्ग-एनएच-४८) वापरून खेड-शिवापूरकडे प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले.

कामाचा कालावधी

२४ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबर रात्री १२.०० या कालावधीत करण्यात येणार आहे.

महत्त्वाचा बदल

सिंहगड किल्ल्याकडे जाणारी सर्व पर्यटकांची वाहतूक बंद

पानशेत, खानापूर, डोणजे, आतकरवाडी येथून सिंहगड घाटमार्गे खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूक बंद.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *