Pune Traffic : गणेश विसर्जनादरम्यान पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, १७ रस्ते राहणार बंद

Pune : पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे गणेशभक्तांसाठी पर्वणीच असतो. पुण्यामध्ये मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यातील गणपती पाहण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक येत आहेत. गणपती पाहण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या पंडालबाहेर मोठ्याच मोठ्या रांगा लावल्या जात आहेत.

पुण्यातील गणेशोत्सवासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता त्याचप्रमाणे वाहतुकिमध्ये देखील बदल करण्यात आल्या होते. आता गणेश विसर्जनासाठी देखील पुणे पोलिस सज्ज झाले आहे. पोलिसांनी गणेश विसर्जनासाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल केले आहेत. पुणे मध्यभागातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

Dhule Accident : रविवार ठरला अप'घात' वार! धुळ्यातील सिंदखेडा तालुक्यात भीषण अपघात; ५ जण जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी पुणे शहरातील प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी हे वाहतुकीचे बदल लक्षात घेता पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी याची नोंद घ्यावी.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply