Pune Traffic : पुणेकरांची लवकरच वाहतूक कोडींतून सुटका होणार? प्रशासनाकडून हालचाली सुरु

Pune : पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार रस्त्यांवरील गाड्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोडींचा प्रश्नही जटिल होत आहे. पुण्याला वाहतूक कोडींतून मुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जता आहेत.

पुणे वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने शहरातील मुख्य चौकांचे सर्वेक्षण केले आहे. यामुळे पुण्यातील मुख्य १० चौकांतील वाहतूक कोंडी लवकरच सुटेल अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने आता पावले उचलली आहेत.

कोंडी होण्यामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी शहरातील ४१ चौकांचे वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर प्रत्येक चौकात कोंडी सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवालही वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिला आहे.

या अहवालानंतर आता महापालिकेकडून उपायजोजनांचा कार्यवाही सुरु केली जाईल. यामुळे लवकरच या कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्याची चिन्हे आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply