Pune Terrorist Case Update : पुणे दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट; सासरा, मेहूणा आणि जावयाने रचला होता स्फोटाचा कट

Pune : पुणे दहशतवादी प्रकरणामध्ये एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. पुण्यातल्या कोथरूड परिसरातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची एटीएसकडून (ATS) चौकशी सुरु आहे. या चौकशीतून मोठी अपडेट समोर आली आहे. सासरा, मेहूणा आणि जावयाने दहशतवादी कारवायांचा कट रचला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना एटीएसने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र इसिस मॉड्यूल प्रकरणात न्यायालयीन कोठडीतअसलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला आणि एनआयने अटक केलेला अदनानली सरकार यांचे नाते आता समोर आले आहे. झुल्फिकार अली बडोदावालाचा मेहुणा म्हणजेच अदनानली सरकार आणि सरकारचा सासरा म्हणजे झुल्फिकारचे वडील अली बदोडावला हे या संशयित दहशतवादी मॅाड्युलचे मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे.

Thane : NCC च्या विद्यार्थ्यांना भरपावसात काठीने फोडून काढलं; जोशी बेडेकर कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

या सासरा, मेहूणा आणि जावयानेच पुण्यामध्ये दहशतवादी कारवायांचा कट रचला होता. रतलाम मॉड्यूल पाठोपाठ आता दहशतवादाचं बडोदावाला मॉड्यूल समोर आले आहे. झुल्फिकार आणि अदनानली हे दर्स म्हणजे प्रवचनाच्या नावाखाली तरूण मुलांना धर्माची चुकीची माहिती द्यायचे आणि त्यांची माथी भडकवायची कामे करत असल्याचे देखील सांगितले जात आहे. झुल्फिकार सध्या एटीएसच्या कोठडीत आणि सरकार हा एनआयएच्या कोठडीत आहे. तर झुल्फिकारचे वडील अली बडोदावाला गुजरात जेलमध्ये आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply