Pune : पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या; घटनास्थळी चिठ्ठी सापडली

Pune : शैक्षणिक क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली असून पुणे शहरातील सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापकांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजू पाटील (वय अंदाजे ४५) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव असून ते पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख पदावर काम पाहात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ मार्च) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास राजू पाटील यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. काही वेळाने त्यांची पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरात पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच पत्नीला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

घटनास्थळाची पाहणी करताना पुणे पोलिसांना एक चिठ्ठीही आढळून आली. प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या प्रचंड ताणामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भातील सर्व बाबींची खातरजमा पोलीस तपासानंतरच होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राजू पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नीही सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पाटील यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय पाटणकर करत असून पोलीस तपासानंतर अपघाताचं नेमकं कारण उघड होणार आहे.



विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या; घटनास्थळी चिठ्ठी सापडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *