PUNE SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशावर बंधने; बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय

PUNE SPPU : सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेल्या गोंधळानंतर विद्यापीठात नाशिकचा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुणे विद्यापीठात आता प्रवेशावर बंधनं घालण्यात आली असून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणालाही विद्यापीठ परिसरात प्रवेश मिळणार नाही आहे. या निर्णयामुळे पुणे विद्यापीठात होणारे गोंधळ आणि अनुचित प्रकार कमी होण्याची शक्यता आहे. 

Nashik Police : नाशिक पोलिसांचं पुन्हा मिशन सोलापूर; ड्रग्ज कारखान्यानंतर आता गोदामवर धाड, कोट्यवधींचा माल जप्त

पुणे विद्यापीठात मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना दोन गटामध्ये गोंधळ आणि हाणामारी झाल्याचं बघायला मिळत आहे. भाजप युवा मोर्चा आणि एसएफआय या दोन गटांमध्ये राडा झाला त्यानंतर विद्यापीठात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि बाकी उपस्थितांनीदेखील या गोंधळात मध्यस्थी करण्याता प्रयत्न केला मात्र तरीही तीव्रता कमी झाली नाही. त्यामुळे असे गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply