Maharashtra Government has approved a 6-lane elevated highway from Hadapsar to Yavat : हडपसरजवळ नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. पुण्यातून बाहेर निघण्यासाठी हडपसरमध्ये सर्वाधिक वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागतो. अर्धा तास ते एक तासांचा वेळ हपसर ते लोणी काळभोर या परिसरातून बाहेर पडण्यासाठी जातो. आता हा प्रश्न कायमचा संपणार नाही. येथील वाहतूककोंडी पाहून सरकारने सहा पदरी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर ते यवत या दरम्यान सहा पदरी उड्डाणपूलाला राज्य सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची संपणार आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसरजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अडचणीवर कायमचा तोडगा काढण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने हडपसर ते यवत दरम्यान २५ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ५,२६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) याची अंमलबजावणी करणार आहे. हा उड्डाणपूल बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) तत्त्वावर विकसित केला जाणार आहे.
|
पुणे-सोलापूर महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चा भाग असून, हडपसर ते यवत हा विभाग गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरण झालेला आहे. यामुळे या मार्गावर दररोज हजारो प्रवासी वाहतूक कोंडीला सामोरे जातात. दररोज सकाळी आणि सायंकाळी मांजरी फाटा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरळी कांचन येथे वाहतूक कोंडी होतेच. यावरच कायमस्वरूपी उपाय म्हणून हा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा उड्डाणपूल केवळ वाहतूक कोंडी कमी करणार नाही, तर प्रवासाचा वेळही कमी करेल. याशिवाय, या प्रकल्पांतर्गत विद्यमान पुणे-सोलापूर महामार्गालाही सहा पदरी विस्तारित केले जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाल्के यांनी जारी केलेल्या शासकीय ठरावात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. हडपसर येथील बस डेपो येथे आधीच एक दुहेरी उड्डाणपूल आहे. मात्र, त्यापलीकडे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. या नव्या उड्डाणपुलामुळे मांजरी फाटा, लोणी काळभोर आणि उरळी कांचन येथील कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे आणि सोलापूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होईल.
शहर
- Mumbai Local Accident : मुंब्य्रात लोकल अपघाताचा आणखी एक बळी, ३० वर्षीय महिलेचा मृत्यू
- Cyber Crime : परदेशातून गिफ्ट पाठवण्याचे आमिष पडले महागात; नवी मुंबईतील महिलेची ५० लाखांत फसवणूक
- Mumbai Local Accident : दोन फास्ट लोकलचा अपघात, रेल्वे रूळावर मृत्यूतांडव, ६ जणांचा मृत्यू
- Mumbai : पुष्पक एक्सप्रेसमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू, रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह, भयानक घटनेनं मुंबई हादरली
महाराष्ट्र
- Maharashtra Weather : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार, आठवडाभर कसं असेल हवामान, कुठं कुठं पडणार कोसळधारा?
- Tuljabhawani Mandir : तुळजाभवानी मंदीर संस्थानला २३ कोटी ५२ लाखांहून अधिकचे उत्पन्न; मंदीरातील उत्पन्नाच्या बाबींचा लिलाव
- Mumbai Local : हार्बर लोकल ठप्प, नेरूळ स्थानकावर तांत्रिक बिघाड, अप-डाऊन मार्गावर ट्रेनच्या रांगा
- Mumbai Local Accident : मुंब्य्रात लोकल अपघाताचा आणखी एक बळी, ३० वर्षीय महिलेचा मृत्यू
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Elon Musk : 'दोस्त दोस्त न रहा', एलोन मस्कचं डोनाल्ड ट्रम्पला चॅलेंज, थेट नवीन पार्टी काढली
- Youtuber : 'आप कमाल की माल, मन कर राह है दबा दू', युट्यूबरचा महिलेसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; शिवीगाळ अन्..
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ