Pune Shocking News : कलेक्टर, आमदारांचा त्रास; आत्महत्येची वेळ आलीये, प्रांताधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बने खळबळ

Pune Shocking News :पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोग आणि महसुलचे अप्पर मुख्य सचिवांना लिहलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवे तसेच आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.

खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी लिहलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूक काळात पुणे रिंग रोड कामाबाबत चौकशी समिती लावून चौकशीत गुंतवुन ठेवल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांची चुकीची कामे आणि आर्थिक मागणी पुर्ण करत नसल्याने वारंवार तक्रारी केल्या जात असून आता हे सर्व सहन होत नाही, आत्महत्या करण्याची वेळ आलीय, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

Wardha Crime : युट्यूब पाहून शिकला चोरी; मौजमस्तीसाठी वर्षभरात केल्या ९३ चोऱ्या, गोव्यात जाऊन उडवायचा पैसे

तसेच माझ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली नाही, तर उद्या माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदर निवडणूक निर्णय आधिकारी आणि प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत. ज्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांचे हे आरोप फेटाळून लावत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही पलटवार केला आहे. दिलीप मोहिते पाटीलांनी यामध्ये जोगेंद्र कट्यारे यांच्या नियुक्तीपासुनच आक्षेप घेत बदलीमध्ये आणि पुणे रिंग रोड जमिन संपादनात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे आरोप केले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply