Pune Swargate : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Pune : शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची १३ पथके रवाना झाली आहे. पुणे पोलिसांच्या १३ पथकांकडून आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेतला जातोय. दत्ता गाडे याने बलात्कार केल्यानंतर ज्यांच्याशी संपर्क केला, त्या सर्व २० जणांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. बुधवारी पुणे पोलिसाचे पथक दत्ता गाडे याच्या घरी धडकले होते. विचारपूसही करण्यात आली. आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला पकडण्यासाठी १ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

स्वारगेट बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पहाटे शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार केला, त्यानंतर तो पसार झाला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. फरार दत्ता गाडे याला पकडून द्या अन् एक लाख रूपये मिळवा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्ह्याची नोंद आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Pune : २८ वर्षापासून चा प्रलंबित प्रश्न मिटला ! कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर कऱण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपी दत्ता गाडे याच्यावर आत्तापर्यंत ७ गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकात पोलिस असल्यासारखे वावर होता, पोलिसांना तपासानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे हा मुळचा गुन्हेगारी वृत्तीचा आरोपी असून त्याच्यावर या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गाडे याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. ह्या दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलिस करत आहेत, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply