Pune : देवदुतासारखे धावले, शेतकऱ्याच्या धाडसाने ५ जणींचे प्राण वाचले; संजय माताळेंचं सर्वच स्तरातून होतंय कौतुक

Pune : पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ७ पैकी दोन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामध्ये अजून मोठी दुर्घटना झाली असती पण त्याच वेळी त्या ठिकाणाहून जात असलेल्या शेतकरी संजय माताळे यांनी धाडस दाखवत ५ जणींना पाण्यातून बाहेर काढले. पण या वेळी दोन जण त्याच्या हाती न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणात पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला असे पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्यांच्या प्रसंगावदानामुळे जीवदान मिळालं आहे.

हे आहेत शेतकरी संजय सिताराम माताळे. काल सकाळी सावडण्याच्या विधी आवरून घरी जात असताना संजय सिताराम माताळे यांना अचानक धरणाच्या बाजूने जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. माताळे आवाजाच्या दिशेने पळत गेले असतात त्यांना काही मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या जीवाची परवा न करता संजय माताळे यांनी थेट पाण्यात उडी घेतली.

तोपर्यंत त्याच्यासोबत असलेल्या त्याचे सहकारी स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले होते. संजय मातळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुलीने एका महिलेला एक एक करून पाण्याच्या कडेला आणले. त्यांचे सहकारी त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढत होते. असे करून त्यांनी पाच जीव वाचवले पण त्यातील दोन मुलींना वाचवू शकले नाहीत.

खडकवासला धरणाजवळ जवळ गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत या पोहण्यासाठी गेलेल्या सात मुली पोहता न आल्याने पाण्यात गेल्या. माताळे व स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे पाच मुलींना वाचविण्यात यश माञ दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला.

हवेली पोलीस तसेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलही दाखल झाले होते. मात्र माताळे यांनी तोवर सर्वाना बाहेर काढले होते. ही घटना कलमाडी फार्म हाऊस जवळ घडली. या सर्व मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून,पुण्यातील गोऱ्हे खुर्द या गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला होत्या आल्या होत्या.

संजय माताळे यांनी दाखलेल्या धाडसाने पाच मुलींना बाहेर काढले आणि इतर सहकाऱ्यांनी प्रथमोपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचे प्राण वाचले मात्र दुर्दैवाने प्रयत्न करून दोन मुली संजय यांच्या हाताला न लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मात्र संजय यांनी दाखवलेले धाडस खरच कौतुकास्पद आहे. या घटनेनंतर संजय माताळे यांना परिसरातील नागरिक व नातेवाईकांचे फोन येत असून सर्व स्तरातून त्यांच कौतुक केले जातेय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply