Sangram Thopate : पुण्यात काँग्रेसला खिंडार! संग्राम थोपटे आज शेकडो कार्यकर्त्यांसह 'कमळ' हाती घेणार

Pune : काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा हात सोडला. त्यांनी चार दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी काँग्रेस सोडण्यामागचे कारण सांगत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये ते कमळ हाती घेणार आहे. पक्ष प्रवेशासाठी संग्राम थोपडे शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातल्या भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. गेली तीन टर्म ते आमदार होते. पण गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तेव्हापासून ते अस्वस्थ असल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली.

Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ

भोर विधानसभा मतदार संघातील भोर, राजगड, मुळशी या तिन्ही तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संग्राम थोपटे भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आपआपल्या ठिकणाहून पहाटेच, संग्राम थोपटे यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान भोरमधील शिवतीर्थ चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भोर शहरातील थोपटे यांचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी पहाटे साडेचार वाजता मुंबईकडे रवाना झाले.

दरम्यान, संग्राम थोपटे यांनी २० एप्रिल रोजी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस सोडताना मनात असलेली खदखद व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले होते की, 'काँग्रेस सोडताना मनात दुःख आहे. पण ही वेळ पक्षानेच आणली आहे. पक्षाने मला संधीच दिली नाही. अनेक वेळा मला डावलण्यात देखील आले. कार्याध्यक्षपद दिले नाही, विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती ती सुद्धा पूर्ण झाली नाही. राजकीय दृष्टिकोनातून पक्ष ताकद देत नव्हता म्हणूनच मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की भाजपमध्येच आपल्याला न्याय मिळू शकेल.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply